यावल महाविद्यालयात मिशन साहसी अभियान संपन्न !

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन साहसी अभियान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. कार्यशाळेचे तिसरे पुष्प श्री तेजस संजय गडे यांनी गुंफले. कृषी अवजारे आणि धान्यावर होणारी वेगवेगळी प्रक्रिया या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी .पाटील होते. अध्य क्षिय भाषणात त्यांनी विद्यार्थिनींनी उद्योगात आपले करिअर करावे असे आवाहन केले. उपप्राचार्य प्रा. एम डी खैरनार डॉ.एस. पी.कापडे, डॉ. हेमंत भंगाळे उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. एस. पी कापडे यांनी केले. आभार युवती सभा प्रमुख डॉ. निर्मला पवार यांनी केले..कार्यक्रमाला प्रा. सी टी वसावे प्रा. सुभाष कामडी, प्रा. अर्जुन गाढे प्रा .नरेंद्र पाटील डॉ.संतोष जाधव मिलिंद मोरे प्रा. रजनी इंगळे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गा. मिलिंद बोरघडे, श्री. प्रमोद भोईटे, श्री. प्रमोद कदम, श्री. दुर्गादास चौधरी यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.