धरणगाव: – तालुक्यातील झुरखेडा येथे स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना धान्य घेतल्याचे बिल पावती दिल्या नाहीत. तहसीलदाराने आदेशित करून देखील या स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमानी व भोंगळ कारभार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. धरणगाव तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना तहसीलदारांनी पत्र क्र.पुरवठा/कावि/24/2024 दि.5 फेब्रुवारी 2024 रोजी आदेशित करून देखील स्वस्त धान्य दुकानदारांचा मनमानी कारभार सुरूच आहे. तहसीलदारांच्या आदेशाचे अवमान करणाऱ्या तसेच स्वस्त धान्य घेतल्याचे बिल पावती न देणाऱ्या झुरखेडा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा याकरीता राष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण ब्यूरोचे जिल्हा उपाध्यक्ष, एम एम कोळी आज जिल्हा प्रशासनाला व विभागीय आयुक्त यांना पत्रव्यवहार करणार आहेत.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली; झुरखेडा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा भोंगळ व मनमानी...