यावल महाविद्यालयात जंतुनाशक दिन साजरा !

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागामार्फत जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी खैरनार, प्रा. अर्जुन पाटील उपस्थित होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सेवक श्री. आर‌. एस. तडवी व मदतनीस श्री.तेजस झोपे उपस्थित होते. श्री. आर. एस. तडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी नेहमीच आरोग्याची दक्षता घ्यायला हवी घरी पाण्यामध्ये टीशेल च पोटॅशियम नियमित वापरावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी घरी पाणी नेहमिच गाळून घ्यावे आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित जागरूक राहावे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र पाटील यांनी केले. तर आभार प्रा. रजनी इंगळे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. आर डी पवार, डॉ. आर. डी. पवार, डॉ. प्रल्हाद पावरा उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. नंदकिशोर बोदडे,प्रा.अक्षय सपकाळे, डॉ संतोष जाधव, डॉ वैशाली कोष्टी, डॉ.निर्मला पवार,प्रा.प्रशांत मोरे यांनी परिश्रम घेतले.