प्रतिनिधी, प्रशांत पाटील मो:7083992832
धरणगाव:- तालुक्यातील सोनवद गावा जवळील विहीर फाटा येथे आज बुधवारी साडेदहा वाजेच्या सुमारास डंपर चालकाने निष्काळजीपणे डंपर चालू करून मागे रिव्हर्स करत असताना रस्त्याच्या कडेला उभे असलेले छोटु प्रकाश कोळी (वय 34) रा.निभोरा हा दिव्यांग तरुण डंपरच्या चकाखाली चिरडले गेल्याने गंभीर जखमी होऊन या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डंपर (क्रमांक एम एच १९ झेड ३५०५) हा असून सदर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.