यावल महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्यात ‘कृषि उन्नती’ सामंजस्य करार संपन्न !

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल व कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षासाठी कृषि क्षेत्रातील विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या संदर्भात तसेच आधुनिक शेतीतून समृद्धीकडे वाटचाल ह्याबद्दल आमदार शिरीषदादा चौधरी,श्री.अजीत पाटील (कृषी विज्ञान केंद्र सेक्रेटरी पाल),प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे (यावल महाविद्यालय) प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी. (धनाजी नाना चौधरी महाविद्यालय फैजपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पाल येथे कृषी उन्नती सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कृषी विज्ञान केंद्र पालचे श्री.महेश महाजन, डॉ.अनिल पाटील प्रा. राजु तडवी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री.अजित पाटील (कृषी विज्ञान केंद्र सेक्रेटरी पाल) यांनी सांगितले की यावल तालुक्यामध्ये शेती व्यवसाय हाच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देऊन उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे सांगितले. विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.