यावल :- तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक यांचा भोगळ व मनमानी कारभार मोठ्या प्रमाणात सुरू असून संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. प्राप्त अर्जांकडे करतात दुर्लक्ष विचारणा केली असतात अरेरावीच्या भाषेचा वापर संबंधित पुरवठा निरीक्षकाला नाव विचारणा केले असता नाव सांगण्यात दिला नकार. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेशित करून देखील होत नाही कारवाई या भोंगळ कारभाराला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अपमानास्पद वागणूक देणाऱ्या यावल पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक व कर्मचाऱ्यांची तातडीने चौकशी करून यांना निलंबित करण्यात यावे याकरिता जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्त यांना पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण ब्यूरोचे जिल्हा उपाध्यक्ष एम एम कोळी यांनी दिली.