प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
यावला:- तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवर बुधवार, 21 फेब्रुवारीपासून बारावी परीक्षेला सुरूवात होत आहे. सकाळी 11 ते 1 या वेळेत मराठी व उर्दु विभागातील एकूण तीन हजार 591 विद्यार्थी इंग्रजीचा पेपर सोडवणार आहेत. तर सर्वच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक व चोख पोलीस बंदोबस्त असेल. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे. यावल व फैजपूर शहरात प्रत्येकी दोन परीक्षा केंद्र असून ग्रामीण भागात तीन असे तालुक्यात सात केंद्र आहेत. यावल कस्टडीत चार तर फैजपूर कस्टडीत तीन असे अशा सात परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पेपर सोडवतील. यावल कस्टडी प्रमुख गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके आहेत तर फैजपूर कस्टडी प्रमुख म्हणून जीत तडवी आहेत. परीक्षा केंद्रावर गस्ती पथक प्रमुख तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड लक्ष ठेवणार आहेत.
केंद्र निहाय विद्यार्थी असे
साने गुरूजी विद्यालय, यावल (569), डॉ. जाकीर हुसेन उर्दू
हायस्कूल, यावल (701), ज्योती विद्या मंदिर, सांगवी (644),
सार्वजनिक विद्यालय, चिंचोली (336),
पी.एस.एम.एस.हायस्कूल, बामणोद (236), डी.एन.कॉलेज,
फैजपूर (581) व मौलाना आझाद हायस्कूल, फैजपूर (524)
असे इंग्रजीचे तीन हजार 591 विद्यार्थी परीक्षा देतील.