31 मार्च पर्यंत टीडीएस दुरुस्ती विवरण सादर करावीत

0

नंदुरबार (जिमाका) – वित्त कायदा, 2024 द्वारे आयकर कायद्याच्या कलम 200 (3) मध्ये केलेल्या सुधारणांनुसार, ज्या आर्थिक वर्षात उप-कलम (3) मध्ये निर्दिष्ट केलेले विवरण सादर करणे आवश्यक आहे त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून 6 वर्षांच्या समाप्तीनंतर कोणतेही सुधारणा विवरण सादर केले जाणार नसल्याने सन 2007-08 ते 2018-19 या आर्थिक वर्षांशी संबंधित टीडीएस दुरुस्ती विवरण 31 मार्च 2025 पर्यंत सादर करावीत असे आवाहन, जळगाव टीडीएस आयकर अधिकारी मनु भारद्वाज यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 31 मार्च, 2025 नंतर 2007-08 ते 2018-19 या आर्थिक वर्षांसाठी कोणतेही दुरुस्ती विवरण स्वीकारले जाणार नसल्याने टीडीएस विवरण वेळेत दुरुस्त करुन घ्यावे, असेही श्री. भारद्वाज यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.