प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
यावल :- नुकत्याच यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिरसाड गावाचे युवा ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामसत्ता संघटनेचे राज्य अध्यक्ष तेजस धनंजय पाटील मोठ्या चुरशीच्या लढतीत विजयी झाले होते. त्यांचे वय अवघे 29 वर्ष आहे. त्यांना भाजपा जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन, तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, विलास चौधरी, उज्जेंनसिंग राजपूत, कृ.उ.बा.सभापती हर्षल चौधरी, किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे यासोबत संघटनेचे आदी पदाधिकारी यांनी कमी वयात पुन्हा तिकीट दिले होते. यानंतर काल झालेल्या चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत पक्षाने व सर्व पदाधिकारी, संचालक मंडळाने तेजस पाटील यांना सर्वात कमी वयाचे असताना बिनविरोध व्हॉईस चेअरमन पदाची संधी दिली. यामुळे संपूर्ण तालुक्यात एक जल्लोष निर्माण झाला आहे. तरुणाईला संधी देऊन आगामी काळात पक्ष नेतृत्व बळकट करून एक आदर्श जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे यांनी निर्माण केला आहे. या आधी माजी खासदार तथा आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांनी तेजस पाटील यांना मागील शेतकरी खरेदी विक्री संघ निवडणुकीत 23 व्या वर्षी तिकीट देऊन बिनविरोध निवडून आणले होते. संघर्षातून विविध संकटांवर मात करून शांतपणे वाटचाल करत तेजस पाटील हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असून विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत असून पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे, सर्व पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ यासोबत सन्माननीय सभासद बंधू भगिनीचे व सर्व पत्रकार बांधवांचे तेजस पाटील यांनी आभार मानले आहे.