प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
औद्योगिक प्रकल्प अन्नपूर्णा ऍग्रोला भेट देऊन घेतली माहिती
यावल: येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने औद्योगीक क्षेत्र भेटीचे आयोजन केले होते. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण उद्योजकता प्रशिक्षण घेतले केळी पासून गोल चिप्स, वेफर्स, चॉकलेट, बिस्किटे, पापड,चिवडा,भाकरी, दारू, कलाकंद,कापड, केळी पीठ,पत्रावळी, रंग, वैरण इत्यादी पदार्थ संदर्भात उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतची माहिती जाणून घेतली. ही भेट प्र. प्राचार्या. डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाल आयोजित केली होती. या भेटीत विद्यार्थ्यांनी अन्नपूर्णा ऍग्रो केंद्राला भेट देऊन केळी पासून बनवण्यात येणारे पदार्थ व त्यासाठी लागणारे विविध साहित्य, खर्च, रोख व किरकोळ विक्री याविषयी माहिती उद्योगाचे मालक श्री.राजेश गडे सौ.शोभा गडे यांच्याशी संवाद साधून जाणून घेतली. तसेच अभ्यास दौऱ्यात उद्योग उभारणीसाठी लागणारी साधनसामग्री, आर्थिक नियोजन, भांडवल उभारणी व त्यासाठीच्या सरकारच्या विविध कर्ज योजनांची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर उद्योगात तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे व प्रक्रिया यांचे बारकाईने निरीक्षण केले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे उद्योगाचे मालक श्री.राजेश गडे व सौ.शोभा गडे यांनी दिली. या भेटीतून उत्तम व्यवसाय करण्यासाठी खूप महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.औद्योगिक अभ्यास दौरा आत्मविश्वास वाढविणारा आणि भविष्यात नवउद्योग स्टार्ट अप साठी चालना देणारा ठरणार आहे. तसेच हिम्मत देणारा ठरणार आहे असेही मत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना अन्नपूर्णा ऍग्रो उद्योगाचे मालक श्री.राजेश गडे व सौ.शोभा गडे यांनी यशस्वी उद्योजक बनण्यासाठी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रकल्प भेटीच्या नियोजनासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी पाटील, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार रा.स.यो. प्रमुख डॉ. आर.डी. पवार, विद्यार्थी विकास महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. रजनी इंगळे, युवती सभा प्रमुख डॉ. निर्मला पवार, महाविद्यालयाचे कर्मचारी प्रमोद भोईटे, जोहरे व विद्यार्थी तेजश्री कोलते, भाग्यश्री भोई, नेहा सोनवणे, श्रीकांत पाटील, तनवीर तडवी यांनी परिश्रम घेतले.