जळगाव दि.4 ( जिमाका ) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी मा. आ. चंद्रकांत सोनवणे, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाशिम आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा असून जळगाव विमानतळावरून ते हेलिकॉप्टर वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्या समवेत पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमान तळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले...