यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या. डॉ. सध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वतीची प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात प्रास्ताविक डॉ. एच. जी. भंगाळे यांनी केले. यात विज्ञान मंडळाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील, डॉ. एस. पी. कापडे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. अनिल बारी (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नॅनोटेक्नॉलॉजी या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच इंद्रधनुष्य, आव्हान, अविष्कार आदी माध्यमातून आपला वैज्ञानिक दृष्टिकोन सकारात्मक होतो. यांत्रिकीकरण, वैद्यकीय क्षेत्र, अल्फाकण, संगणक, ह्या विषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विज्ञान मंडळ हे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस महत्त्वाची भूमिका बजावते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम. डी. खैरनार यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की वैज्ञानिक व्याख्यान, स्पर्धा परीक्षा ह्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन वृध्दिंगत व्हावा यासाठी विज्ञान मंडळ कार्यरत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सूक्ष्म निरीक्षणातून नवीन गोष्टींची नोंद घ्यावी. चंद्रयान -3 यशस्वी होण्यासाठी इस्रोचे प्रयत्न या बद्दल माहिती घ्यावी. वर्तमान युगात विज्ञानावर आधारित संशोधनात्मक रित्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढून प्रगती होणे ही अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले, तर आभार डॉ. आर. डी. पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशस्वीतेसाठी डॉ. पी. व्ही. पावरा प्रा.सी. टी. वसावे, प्रा. सुभाष कामडी, डॉ. संतोष जाधव डॉ. निर्मला पवार, डॉ. वैशाली कोष्टी प्रा. अर्जुन गाढे, प्रा. पी. व्ही. मोरे, सचिन बारी, प्रमोद कदम, मिलिंद बोरघडे, अनिल पाटील, प्रमोद जोहरे, अमृत पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.