प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे दि ११ व १२ मार्च २०२४ रोजी बॅंगलोरहुन नॅक कमिटीने पुनर्मूल्यांकन परीक्षण भेट दिली होती. कमिटीने नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकन यादीत “ब” दर्जा ( B grade) प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागात वसलेल्या या महाविद्यालयाचा दर्जा कायम राखण्यासाठी संस्थेचे मानद सचिव श्री निलेश भाऊ भोईटे, श्री. दादासाहेब वीरेंद्र भोईटे, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, महाविद्यालय प्रशासन व व्यवस्थापन मंडळ नियमित प्रयत्न करत असते. दर पाच वर्षांनी महाविद्यालयाचे नॅक पुनर्मूल्यांकन करावयाचे असते. मागील (२०१८-१९ ते २०२३-२४)पाच वर्षाची महाविद्यालयाची माहिती कमिटीला ऑनलाईन पद्धतीने पाठवली होती सर्व दस्तऐवजांची सत्यता पडताळणी करून नॅक कमिटीने महाविद्यालय परिसर, कार्यालय, ग्रंथालय, प्रयोगशाळा, आय क्यु एसी हॉल, शिकवणी अभ्यासक्रमाच्या विषय निहाय प्राध्यापकांनी पी. पी टी .स्लाईड्सवर केलेले सादरीकरण, बातमी, फोटो प्रदर्शन इतर कार्यक्रम याची परिक्षणात्मक पाहणी केली असता महाविद्यालयाला अंकेक्षण प्रक्रियेत “ब”.२.३३ दर्जाचे गुण मिळाले आहेत. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा. एम.डी. खैरनार, प्रा. संजय पाटील, आय. क्यु. एसी. समन्वयक डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. सुधीर कापडे, प्रा.एस.आर.गायकवाड,प्रा.मुकेश येवले,श्री.मिलिंद बोरघडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे महाविद्यालयाचे तिसऱ्यांदा नॅक पुनर्मुल्यांकन झाले त्यात”बी” श्रेणी प्राप्त झाली आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नॅकच्या कामकाजासाठी प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख (नूतन मराठा महाविद्यालय जळगाव) प्र. प्राचार्य व्ही .एस. पवार (वरणगाव महाविद्यालय) डॉ. हेमंत येवले, श्री मधुकर जगदाळे,सौ.प्रेमलता झझंने, श्री. किरण देशमुख, श्री.अनिल इंगळे, डॉ.आर. डी.पवार, डॉ. प्रल्हाद पावरा, प्रा. मनोज पाटील, प्रा. संजीव कदम महाविद्यालयातील उच्च माध्यमिक शिक्षकवृंद, किमान कौशल्य विभाग, तासिका तत्वावरील प्राध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,सफाई कामगार, रात्रपाळी वाचमन, विद्यार्थी,माजी विद्यार्थी,पालक, यावल शहरवासीय नागरिक, नगरपरिषदेचे कर्मचारी यांचे सर्वांचे सहकार्य लाभले.