आ. रोहित पवारांच्या हस्ते “न्यू ईच्छादेवी रिक्षा स्टॉप” फलकाचे अनावरण

0

जळगाव:- येथील ईच्छादेवी मंदिराजवळ राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा युनियनच्यावतीने न्यू ईच्छादेवी रिक्षा स्टॉपचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करून व फित कापून करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटिल , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , उपाध्यक्ष अमोल कोल्हे , भला तडवी, विशाल देशमुख आदि कार्यकर्ते उपस्थित होते. रिक्षा स्टॉप ची कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष गणेश निकम, उपाध्यक्ष मनोज जाधव , मंजूर पटेल , सुरेश मराठे , बापू कापसे , सदस्य आकाश शेटे , किरण जाधव , पवन मराठे , इस्माईल सय्यद , मुकेश नाथ , एल के सूर्यवंशी .