यावल महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा अपघाताने दुदैवी मृत्यू

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथील टीवायबीए (हिंदी विभाग) विद्यार्थिनी कु.बारेला रेतना दिनेश रा.लंगडाआंबा येथील रहिवाशी होती.हि यावल महाविद्यालयात टीवायबीए शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती.आदिवासी मुलींचे वसतिगृह यावल, येथे राहत होती.दोन दिवसापूर्वी तब्बेत बरी नसल्याने घरी गेली असता. अचानक तब्बेत खालावली असल्याने तिचे वडील मोटारसायकल वरून दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना काही अंतरावर जाऊन अचानक भोवळ येऊन खाली पडली. डोक्याला मार बसल्याने जागीच ठार झाली. अति दुर्गम भाग असल्याने दवाखान्यात घेऊन जाणेही जमले नाही. पोलिस पाटील व सर्व गावातील वरिष्ठ लोक एकत्र येऊन पंचनामा करून घेण्यात आला.