उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
सलग ११ महिन्यांची नियुक्ती द्या यासह विविध मागण्यांसाठी प्राचार्यांना दिले निवेदन
यावल : – राज्यभरातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या संघटनांनी विद्यापीठीय परीक्षा कामकाजावरील बहिष्कारात सहभाग नोंदवला. यात यावल महाविद्यालयातील प्राचार्यांना सोमवारी विविध मागण्यांचे निवेदन दिले.राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर सध्या तासिका तत्त्वावर प्राध्यापक नियुक्त केले जात आहेत. या प्राध्यापकांना ९ महिन्यांची नियुक्ती दिली जाते. यात ३ ते ४ महिने परीक्षेचा कालावधी असतो. हा कालावधी वगळता फक्त ६ महिन्यांचेच मानधना या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मिळते. परीक्षा प्रक्रियेत कनिष्ठ निरीक्षकाचे काम केल्यावर 3 तासांसाठी ७५ रुपये एवढी तुटपुंजी रक्कम या उच्च शिक्षितांच्या हाती ठेवली जाते. ही रक्कमदेखील वर्षभर मिळत नाही. माहे नोव्हेंबर,डिसेंबर व एप्रिल महिन्याचे मानधन मिळावे. सलग ११ महिन्यांची नियुक्ती द्यावी आणि दरमहा पगार मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी विद्यापीठ परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे. या आशयाचे निवेदनही प्राचार्यांना देण्यात आले. यावेळी तासिका तत्वावरील प्राध्यापक उपस्थित होते.