यावल महाविद्यालयात भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थी विकास विभागांतर्गत भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थी दशेत असताना परिश्रम आणि संघर्षाला तोंड दिले भारतीय संविधान, राज्यघटनेतील कलम,तत्व मुलभूत अधिकार, एकुणच जीवन भीम गीतांमध्ये दिसून येते आहे. असे सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा अर्जून पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना “वाचनाला” अधिक महत्त्व दिले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वच गीतांमध्ये संघर्ष,करूणा आणि तेजेस्वीता हे गुण उलगडलेल आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी भीम गीत गायन करून डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगाला उजाळा दिला. कु. नेहा संजय सोनवणे प्रथम, कु. रश्मी बारेला द्वितीय तर
कु.सुनंदा बारेला ही तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. रजनी इंगळे यांनी केले तर आभार डॉ. निर्मला पवार यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला डॉ. हेमंत भंगाळे, डॉ आर. डी. पवार, डॉ. प्रल्हाद पावरा, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कामडी, प्रा. प्रशांत मोरे श्री.मिलिंद बोरघडे, श्री. प्रमोद जोहरे, श्री.प्रमोद भोईटे, यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.