नंदुरबार व नवापूर तालुक्यातील पोलिस पाटील भरती; 8 सप्टेंबरला होणार आक्षरण सोडत

0

नंदुरबार: दिनांक 6 सप्टेंबर (जिमाका वृत्त):- नंदुरबार, नवापूर तालुक्यातील पोलिस पाटील संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, शासनाच्या धोरणानुसार महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात, (प्रशासकीय इमारत टोकरतलाव रोड, नंदुरबार) सोडत काढण्यात येणार असल्याचे, उपविभागीय अधिकारी (नंदुरबार) मंदार पत्की यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. नंदुरबार तालुक्यातील 51 महसूली गावात व नवापुर तालुक्यातील 44 महसुली गावात अशा एकूण 95 महसूली गावांची पोलिस पाटील संर्वगाची पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील पदे रिक्त असलेल्या महसूली गावात शासन धोरणानुसार 30 टक्के महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील संबंधीत गावातील नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आव्हानही श्री. पत्की यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.