उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ .संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत्न, महामानव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा.एम.डी.खैरनार यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उप प्राचार्य प्रा.अर्जुन पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देताना सांगितले की विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार हे भारताबरोबरच जगातील जर्मनी, अमेरिका, इंग्लंड आणि इतर देशातही महान ठरले आहेत. डॉ. आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्राध्यापक, पत्रकार, लेखक, विचारवंत, थोर समाजसुधारक, राजकारणी, अर्थतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, सर्वच धर्माचे अभ्यासक असे सर्वस्पर्शी गुणसंपन्न व्यक्तिमत्व होते त्यांचा आदर्श सर्वांनीच घेतला पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री. मिलिंद बोरघडे, श्री. संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले, बौद्ध गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.