सुपडू संदानशिव यांच्या प्रयत्नांना यश
यावल:- तालुक्यातील चुंचाळे गावाच्या शेजारी असलेल्या बोराळे गावातील समाज मंदिर (विहारात) दिनांक ९ सप्टेंबर २०२३ शनिवार रोजी बुद्ध पूजा करत फुले,शाहू,आंबेडकर नावाने अभ्यासिका चालू करण्यात आली आहे. अभ्यासिका ही धम्म दानातून चालू करण्यात आल्याचे सुपडू संदानशिव यांनी सांगितले आहे,सदर अभ्यासिकेसाठी भुसावळ येथील व्यावसायिक व धम्म बांधव आयु. सिद्धार्थ वानखेडे यांनी अभ्यासिकेस लागणाऱ्या पुस्तकांचा एक सेट दिला आहे,तरी आज दिनांक ९ रोजी फुले,शाहू,आंबेडकर नावाने अभ्यासिका सिद्धार्थ वानखेडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करुन सुरू करण्यात आली असून चुंचाळे,बोराळे गावातील शिक्षित तरुण युवक/युवतीसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. गावातील जे मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत,त्यांना अभ्यास करण्यास मदत होईल,भविष्यात मुले नौकरीस लागल्यास गावाचे नाव उंचवेल,गावाचे नाव लौकीक होईल असे प्रखर मत उद्घाटन प्रसंगी सिद्धार्थ वानखेडे यांनी युवकानं समोर आपले मत मांडले तर बोराळे येथील समाज मंदिर (विहारात) योगदान देणाऱ्या सर्व युवकांचे अभिनंदन केले,तसेच संदानशिव यांनी सध्यास्थिती चाललेले शिक्षण,काळात शिक्षणाची गरज आणि युवकांनी पुढे कसे जावे,त्यांनी अभ्यास कोण कोणत्या क्षेत्राचा करावा,कोणत्या पुस्तकांचा करावा या बद्दल मार्गदर्शन केले,तर एवढ्याने होणार नसून अभ्यासिकेला अजुन पुस्तकांची आवश्यकता असून धम्म दात्यांना पुस्तके रुपी दान देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सदर प्रसंगी भुसावळ येथील सिद्धार्थ वानखेडे,मनीष सोनवणे, बोराळे गावातील राजु वानखेडे,सुहास वानखेडे,प्रदीप वानखेडे,राज गजरे,सुपडू संदानशिव,जळगांव येथील सोपान बाविस्कर,चुंचाळे बोराळे येथील अभ्यासू विद्यार्थी त्याच बरोबर शिक्षणासाठी येणारे मुले,मुली उपस्थित होते तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वानखेडे यांनी केले तर धम्म दात्यांचे आभार प्रदर्शन राजू वानखेडे यांनी मानले.