उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
चुंचाळे ता.यावल:- येथे गुरु रघुनाथ बाबा व शिष्य वासुदेव बाबा हे एकाच दिवशी वैशाख शुध्द बारसला समाधिस्थान झाले या गुरु व शिष्य यांच्या अनोखा पुण्यतिथी सोहळा सोमवारी दि.२० रोजी श्री समर्थ वासुदेव बाबा दरबार येथे होईल. श्री सुकनाथ बाबा हे श्री क्षेत्र काशी येथुन चुंचाळे येथे आले येथे त्यांनी अखंड बारा वर्ष तप केला म्हणून चुंचाळे हे गाव सुकनाथ बाबा यांची तपोभुमी म्हणून ओळखली जाते तसेच त्याचे चिरंजिव रघुनाथ बाबा यांचा जन्म याच भुमीत झाला म्हणून हे गाव त्यांची जन्मभुमी म्हणूनओळखली जाते व वासुदेव बाबा यांची कर्मभुमी या नावाने हे गाव प्रसिद्ध आहे चुंचाळे या पावन नगरीत महाराष्ट्रासह गुजरात,एम.पी व परिसरातील गावामध्ये देखील यांचे शिष्यमंडळी आहे. याच पिता पुत्राच्या एकाच मंदीरात समाधीचे स्थान वर्डी ता.चोपडा येथे आहे सुकनाथ बाबा यांनी 1935 मध्ये तर रघुनाथ बाबा 1979 मध्ये वर्डी ता.चोपडा या गावात समाधिस्थ झाले त्यांचे शिष्य वासुदेव बाबा हे गुरु रघुनाथ बाबांन बरोबर 1980 मध्ये चुंचाळे येथे बालपण अवस्थेत घर शिरपुर सोडुन बाबाची आणि पुरातन असलेली समाधी यांची स्नान .पुजापाट .आरती .करीत मंदिरात भक्ती केली व वासुदेव बाबांनी गावकरी आणि शिष्यमंडळीच्या सहकार्याने गावात मंदिर बांधण्यास प्रारंभ केला आणि आज हे येवढे मोठे भले मंदिर उभारले मंदिरात 21 किलो चांदीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सन 2000 मध्ये करण्यात आली या मंदिराचा कळस 61 फुट उंचीचा आहे. असा साजरा होतो अनोखा सोहळा – वासुदेव बाबा हे नेहमी वैशाख शुध्द बारसला त्यांचे गुरु रघुनाथ बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करत होते तेव्हा ते भक्ताना सागायचे की मी समाधिस्त झाल्यावर सुद्धा माझ्या गुरुची पुण्यतिथी साजरी करीत जा पंरतु गावातील गावकरी व शिष्यगाण तुम्ही जसे तुमच्या गुरुची पुण्यतिथी साजरी करतात तशिच आम्ही तुमचीही पुण्यतिथी साजरी करत जाऊ आपल्या गुरुची आपल्यानतरही पुण्यतिथी व्हावी म्हणूनच आपल्या गुरुच्या पुण्यतिथी दिवशीच वासुदेव बाबा समाधिस्थान झाले तर 2001 पासुन असा गुरु शिष्य पुण्यतिथीचा सोहळा होऊ लागला या सोहळ्यासाठी मध्यप्रदेश .गुजरात.कर्नाटक येथील भाविकांचा यात समावेश आहे. असा होईल कार्यक्रम -पहाटे 5 ला मुर्तीचे स्नान व समाधी स्नान 6 ला मारुती अभिषेक दुपारी 12 ला महाआरती सायंकाळी 7 ला आरती सकाळी 8 ते रात्री पर्यंत आरतीवेळ सोडून भजन.भारुड सुरु राहतील महाप्रसादात ९ क्विंटल आंब्याचा रस तर ११ क्विंटल पुरणपोळीचा महाप्रसाद वाटप होईल दुपारी 1 ते रात्रीपर्यंत महाप्रसादाचे वाटप होईल. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री समर्थ वासुदेव बाबा भक्तगण व भंजनी मंडळ आणि गावकरी मंडळीने केले आहे.