पुण्यातील नामांकित शाश्र्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील यांची शिरसाड वाचनालयाला सदिच्छा भेट !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- तालुक्यातील शिरसाड गावाचे रहिवासी तथा स्वतःच्या कर्तृत्वावर पुण्यासारख्या मोठ्या शहरात स्वतःची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारी नामांकित शाश्वत अकॅडमी उभी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय महेश सुभाष पाटील यांनी दि.17 मे रोजी शिरसाड येथील कै.सौ. कमलाबाई एकनाथराव पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय येथे सदिच्छा भेट दिली व तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वाचनालयाचे सचिव तथा यावल शेतकरी खरेदी विक्री संघाचे उपसभापती तेजस धनंजय पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी रवींद्र धनगर, लीलाधर धनगर, विकास वाघ तथा सर्व सहकारी मित्र व वाचनालयातील विद्यार्थी उपस्थित होते. महेश पाटील यांनी शून्यातून स्वतःची वेगळी ओळख आज पुण्यासारख्या शहरात निर्माण केली आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी अधिकारी पदापर्यंत पोहोचले आहेत. महेश पाटील यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आमच्या शिरसाड गावाचा नावलौकिक वाढला आहे असे तेजस पाटील यांनी सांगितले.