उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
ग्रामपंचायतीच्या इतिहासातला पहिलाच विद्यार्थी सत्कार कार्यक्रम; सरपंच दिपक पाटील यांची संकल्पना
यावल:- तालुक्यातील साकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयातर्फे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.साकळीचे लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील यांच्या शैक्षणिक हिताच्या संकल्पनेतून सदर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.सत्कारामध्ये गावातील इ. १० वी व इ.१२ वीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गावातील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, अंजुमन -ए- इस्लाम उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालय ,शिरसाड- साकळी या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा यथोचित गुणगौरव करण्यात आला.त्याचप्रमाणे इतर सत्कारामध्ये साकळी पीक संरक्षण सोसायटीच्या चेअरमनपदी फैजानखान हाजी युसूफखान यांची तसेच व्हाईस चेअरमनपदी वासुदेव श्रीराम मोते यांची नुकतिच निवड झाल्याबद्दल त्याचप्रमाणे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी साकळी ग्रामपंचायतीचे सदस्य मुकेश बोरसे यांची निवड झाल्याबद्दल या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.साकळी ग्रामपंचायतीचा गेला इतिहास पहाता यंदाच्या वर्षी प्रथमच गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर सरपंच दिपक पाटील, उपसरपंच फक्रुद्दीनखान कुरेशी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी पी.आर.धनगर उपस्थित होते.कार्यक्रमाला गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ तसेच सत्कारार्थी विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सत्काराने सर्वच विद्यार्थी भारावून गेले काही विद्यार्थ्यांनी सत्काराप्रसंगी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली यांनी केले.