यावल:- चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामाअंतर्गत गावात दोन ठिकाणी रस्ता कामांचे भूमिपूजन दि.१० रोजी आ.सौ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे होते. तसेच उपस्थित मान्यवर कार्यकर्त्यांचे हस्ते सुद्धा नारळ वाढवून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.या विकास कामांमध्ये गावातील प्रभाग क्रं.५ मध्ये पाच लाख रु.च्या निधीतून श्रीराममंदिरा समोरील रस्त्यावर पेव्हर ब्लाक बसवणे तसेच साकळी-चुंचाळे-बोराळे ग्रा.मा.२४ हा रस्ता ६१.७५ लाख रु.च्या निधीतून रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामांचा समावेश आहे. यावेळी यावल कृऊबाचे संचालक सुर्यभान सर,शिवसेनेचे कार्यकर्ते विनायक पाटील (मनवेल), शिरसाडचे माजी सरपंच गोटू सोनवणे, जेष्ठ कार्यकर्ते अशोक महाजन (साकळी), दक्षता समितीचे सदस्य महेंद्र चौधरी (साकळी),भाजपा वैद्यकिय आघाडीचे जिल्हा सह-संयोजक डॉ.सुनिल पाटील,यावल पं.स.माजी उपसभापती भास्कर तायडे, प्रगतिशिल शेतकरी ज्ञानेश्वर मोते,माजी ग्रा.पं.सदस्या सौ.निलिमा नेवे, कु.ऐश्वर्या सोनार,सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना बाविस्कर,साकळी विकासोचे संचालक ईश्वर कोळी,भरत चौधरी (सर),संजय पाटिल (साकळी),रविंद्र नेवे,तृषार ठोसरे यांचेसह शिवसेनेचे असंख्य युवक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.त्याचप्रमाणे येत्या काळात आमदारांच्या प्रयत्नातून गावात अजून काही विविध विकास कामे केली जाणार असून आमदारांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले साकळीगाव ते बस स्टँड रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम पावसाळा संपल्यानंतर लवकरच सुरू करण्यात येईल. या रस्त्याच्या कामात सदर रस्ता कॉंक्रिटीकरण तसेच दोन्ही बाजूला मजबूत व खोलगट गटारींचे बांधकाम केले जाणार आहे.असे माजी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.