जळगाव दि. 6 ( जिमाका ) – प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव च्या वायुवेगाने पथकामार्फत तपासणी दरम्यान तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कराच्या थकीत करापोटी चाळीसगाव आगारात एकूण 26 अटकाव करुन ठेवलेल्या वाहनांपैकी १५.जुलै २०२४ रोजी ०७ ऑटोरिक्षा वाहनांची ऑफलाईन लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आलेली असून, उर्वरित १९ वाहनांपैकी १५ वाहनांची ई-लिलाव प्रक्रिया करण्याचे ५ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रस्तावित करण्यात आलेले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदरची ई-प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली असून, ई-लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच आपणास त्याबाबत अवगत करण्यात येईल, असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का.) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव आरटीओ कडून थकीत कर व पर्यावरण करापोटी अटकाव करुन ठेवलेल्या वाहनांचा ई-लिलाव...