मुख्यमंत्री वयोश्री योजना व तीर्थ दर्शन योजनेसाठी शिबीराचे आयोजन !

0

नंदुरबार, दि.9:- मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व इतर अनुषंगिक कागदपत्र, दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी आज 10 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रकाशा येथील धर्मशाळा सभागृहात व 11 वाजता जयनगर ग्रामपंचायत आवार येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे असे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना व 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत पात्र वद्ध लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व इतर अनुषंगिक कागदपत्रे, दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत हे उपस्थित राहणार असून शहादा तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू ज्येष्ठ नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.