उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात यावल येथील ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी, प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन आभासी पद्धतीने प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी यांचे हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे कॅबिनेट मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस,मा. श्री. अजितदादा पवार यांचे उपस्थितीत दिनांक 20 सप्टेंबर 2024 शुक्रवार रोजी होणार आहे. यासाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल आणि महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र जळगाव यांच्यात एम. ओ. यु करार झालेला आहे. या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रात विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यासाठी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे मानद सचिव मा. श्री. निलेश रणजीत भोईटे, (ज. जि. म. वि. प्र. संस्था) मा.श्री. दादासाहेब श्री. वीरेंद्र भोईटे संचालक (ज. जि. म. वि. प्र. संस्था) मा. श्री. सुनील भोईटे संचालक (ज.जि.म.वि.प्र.संस्था )श्री. कुंदन फेगडे (अध्यक्ष आश्रय फाउंडेशन, यावल) यांनी विद्यार्थ्यांना या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, उपप्राचार्य डॉ.सुधीर कापडे आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे महाविद्यालयीन समन्वयक प्रा. सी. पी. गाढे यांनी यावल परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर, उद्योजक आणि पालकांना अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना दुपारी १२.०० वाजता या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.