यावल महाविद्यालयात आभासी पद्धतीने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास” विभागाअंतर्गत कार्यक्रम

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा अंतर्गत रोजगार उद्योजगता व नाविन्यता विभागाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात वर्धा येथून ऑनलाइन स्लाईडवर भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना संबोधित करताना सांगितले की कौशल्ययुक्त शिक्षण ही आज काळाची गरज बनली आहे. रोजगार आणि उद्योजकता हे आजच्या युवकांना उज्वल भविष्याशाच्या प्रगतीसाठी सक्षम करण्याचे माध्यम आहे. त्यासाठी युवकांनी कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. हे सांगताना पंतप्रधान म्हणाले की ज्ञान विश्वकर्मा योजना, दिनदयाल उपाध्याय योजना यांच्यामार्फत ७००० लोकांना रोजगार मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. देशातील नवीन रस्ते, सिंचन,महामार्ग, नवीन औद्योगिक, क्रांतीसाठी शासन वचनबद्ध आहे. असे आवाहन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद व कर्मचारी आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुनीलभाऊ भोईटे संचालक (ज.जि.म.वि.प्र.सह. मर्यादित संस्था),डॉ. जागृती फेगडे (आश्रय फाउंडेशन यावल) उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की महाराष्ट्र शासनाने २०१५ पासून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग हे स्वतंत्र मंत्रालय सुरू केले आहे. या विभागाअंतर्गत आजच्या युगात कौशल्य युक्त व सक्षम युवक निर्माण करणे हा उद्देश असून रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य प्राप्त नसलेल्या तरुणांना बांधकाम, कृषी, इलेक्ट्रॉनिक, वित्त, व्यवसाय प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शासनामार्फत जवळपास १९०० कोर्सेस सुरू करण्यात आले असून युवकांनी आपल्या प्रगतीसाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजेत यावल महाविद्यालयात सॉफ्टवेअर कार्यक्रम इंडस्ट्रीज पॉईंट कोर्स सुरू केला असून ३० होतकरू व प्रामाणिक विद्यार्थ्यांना पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येणार असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिवाय सायबर आणि फिजिकल वर्ग सुरू करण्यात येणार आहे. ही आपल्यासाठी मोठी संधी आहे. असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले, प्रास्ताविक प्रा. इमरान खान यांनी केले.तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार याने मानले यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. आर. डी. पवार, प्रा. डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. मुकेश येवले, प्रा. मनोज पाटील. उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. सागर लोहार (यावल) प्रा. ईश्वर पाटील, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. सुभाष कामडी, श्री. दुर्गादास चौधरी, श्री. मिलिंद बोरघडे तासिका तत्वावरील प्राध्यापक उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.