उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी कॉपी व तान तनामुक्त परीक्षा विषयावर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. कैलास माळी (माळी क्लासेस यावल) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना कोणत्याही शॉर्टकट व कागदोपत्री कॉपी सारख्या पर्यायी मार्गावर अवलंबन राहून कसलाही ताण तणाव घेऊ नये परीक्षा विद्यार्थी जीवनातील आणि गुणवत्तेचे मूल्यमापन केले जाते. सकारात्मक विचार करून जास्त वेळ मोबाईलचा वापर न करता अभ्यास हसत खेळत करत परीक्षेला सामोरे जायचे असते असे सांगितले. कार्यक्रमाचे दुसरे वक्ते डॉ. आर. डी. पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभ्यास तासिका वेळेवर करणे रनिंग नोट्स काढणे आणि कुठल्याही प्रकारचा ताण ताण न घेता परीक्षेला सामोरे जाणे आज महत्त्वाचे आहे स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असल्यास कॉपी पासून दूरच राहायला पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी मनामध्ये परीक्षेत संदर्भात कुठलेही दडपण न आणता कुठलीही भीती निर्माण न करता अभ्यासाची गोडी प्रथम निर्माण करून घ्यायला हवी असणार स्वतःच्या मनावर ठाम राहून आत्मविश्वासाने अभ्यास लेखन, वाचन, मनन, आणि चिंतन ह्या प्रक्रिया वेळोवेळी आणि सातत्य ठेवून नियोजनपूर्वक आचरणात आणल्यास कुठलीही परीक्षा आपल्याला अवघड जाणार नाही आणि परीक्षेचा ताणतणाव निर्माण होणार नाही म्हणून प्रथम वाचन आवृत्तीकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. पी. कापडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कामडी, प्रा. छात्रसिंग वसावे, प्रा. नागेश्वर जगताप, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद जोहरे यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.