जळगाव दि. 22(जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया राज्यभरात पार पडली. जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 मतदार संघात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात एकुण 65.80 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हानिवडणूक तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. संध्याकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. मतदान काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही,सर्व मतदारसंघात मतदान सुरळीतपणे पार पडली.
जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
१५ अमळनेर -65.61%
१२ भुसावळ -57.75%
१७ चाळीसगाव -61.67%
१० चोपडा -66.58%
१६ एरंडोल- 68.76%
१३ जळगाव सिटी- 54.95%
१४ जळगाव ग्रामीण -69.33%
१९ जामनेर -70.55%
२० मुक्ताईनगर- 70.71%
१८ पाचोरा -68.70%
११ रावेर – 74.84%
एकुण मतदान 65.80