उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.सुभाष कामडी यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक,कृषी, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकारीता, साहित्यिक, काळाराम मंदिर सत्याग्रह,महाडचा चवदार तळे सत्याग्रह, याबाबत महत्त्वाचे कार्य आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना महापुरुषांचे विचार आणि कार्य यांचा आदर्श घेऊन अभ्यास केला पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आंतरराष्ट्रीयस्तरावरही उल्लेखनीय आहे.समाजातील प्रत्येक घटकाचे ज्ञान, विविध प्रकारच्या योजना,सवलती, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, शेतकऱ्यांसाठी योजना, स्रीयांसाठी हिन्दू कोड बिल काढले, विशेष म्हणजे अस्पृश्य समाजासाठी न्याय हक्कासाठी योगदान दिले आहे.कुशाग्रबुध्दीमत्ता, वाचन संस्कृती साठी राजगृह ग्रंथालय मुंबई येथे उभारले आहे. राज्यघटनेने सर्वांना अधिकार दिले आहेत. घटना लिहायला २ वर्ष ११महिने १८दिवस हा कालावधी लागला.देशाचे पहिले कायदामंत्री व वकिल यासंदर्भात माहिती देताना त्यासाठी राजर्षी शाहू महाराज, दादासाहेब गायकवाड, सयाजीराव गायकवाड यांचे आंबेडकरांना सहकार्य लाभले असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. आर. डी. पवार यांनी केले.तर आभार उपप्राचार्य डॉ सुधीर कापडे यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील,प्रा.मनोज पाटील,प्रा. संजीव कदम,प्रा.चिंतामण पाटील,प्रा.सोनाली पाटील,प्रा.राजेंद्र थीगळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलींद बोरघडे, संतोष ठाकूर, दुर्गादास चौधरी, प्रमोद भोईटे, प्रमोद कदम, रमेश साठे, प्रमोद जोहरे यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.