उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- भारतीय कृषी विमा कंपनी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यावल यांच्या विद्यमाने शेतकऱ्यांमध्ये पीक विमा सप्राह जनजागृती केली जात आहे २ ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये वेगवेगळे उपक्रम भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत जिल्हाभरात राबविण्यात येत आहे त्यामुळे यावल तालुक्यातील शेतकरयांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आहे.यावल येथे जनजागृतीच्या अनुषंगाने शेतकरी पाठशाळेचा कार्यक्रम आयोजित केला होता सहा दिवस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आली प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या बाबत जनजागृती करणे हे गरजेचे असून हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे.यावेळी तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वारके , तालुका कृषी कार्यालय मधील कर्मचारी पीक विमा तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील, प्रशांत पाटील व यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. तसचे जिल्हा प्रतिनिधी राहुल पाटील आणि भारतीय कृषी विमा कंपनी यांचे मार्गदर्शन लाभले.