यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
सदर स्पर्धेमध्ये 13 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत प्रथम सायली निवृत्ती भागवत (एस .वाय .बी .कॉम) द्वितीय जयश्री राजेंद्र चौधरी (एस .वाय .बी .कॉम) व तृतीय जयश्री संजय सोळंके (टी. वाय .बी .ए) यांनी यश प्राप्त केले. सदर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी व्ही पावरा व प्रा. प्रतिभा रावते व प्रा. रजनी इंगळे यांनी सहकार्य केले.