समह साधन केंद्र साखळी क्रीडा स्पर्धेमध्ये दगडी शाळेचे विद्यार्थी चमकले !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जि.प. प्राथ.शाळा साकळी येथे आयोजित ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५’ केंद्रप्रमुख श्री.किशोर चौधरी व क्रीडा समन्वयक श्री.समाधान कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या आहेत क्रीडा स्पर्धेमध्ये ,वैयक्तिक खेळ-१०० मीटर धावणे या खेळात तुषार कोळी यांने द्वितीय क्रमांक मिळवला,लिंबू चमचा या खेळामध्ये- खुशी समाधान भिल ने द्वितीय क्रमांक व अर्जुन विनोद भिल ने प्रथम क्रमांक मिळवला.तसेच सांघिक खेळ – लंगडी मध्ये द्वितीय (उपविजेता) क्रमांक मिळवला. तसेच शिक्षक धावणे स्पर्धेत जि.प.शाळेचे मुख्याध्यापक,श्री.ईश्वर तागड यांनी प्रथम क्रमांक मिळवला.अशा प्रकारे वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना ,शाळेचे मुख्याध्यापक श्री.तागड सर,श्रीम.पावरा मॅडम, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी श्री.जयेश कोळी सर,यांनी मार्गदर्शन केले.शाळा व्यवस्थापन समितीने सर्व खेळाडू व शिक्षकांचे अभिनंदन केले..तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सुभाष मोरे यांनी खेळाडूंना ५००₹ चे बक्षीस देऊन विशेष कौतुक केले.