गावात तब्बल ७० ठिकाणी केक कापून सरपंच दिपक पाटील यांच्या वाढदिवस जल्लोषात साजरा !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- साकळी येथील लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील यांच्या आज दि.१५ जानेवारी २०२५ रोजी ३९ व्या वाढदिवसानिमित्त गावात विविध कार्यक्रमांनी व सामाजिक उपक्रमांनी तसेच गावात ठिकठिकाणी मध्ये केक कापून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.सरपंच दिपक पाटील हे गावातील युवा वर्गाचे चाहते असल्याने गावातील जवळपास प्रत्येक गल्ली-बोळामध्ये युवा वर्गाच्या सोबतीने सरपंच दिपक पाटील यांनी जवळपास तब्बल ७० ठिकाणी केक कापला.यावेळी फुलांचा वर्षाव करण्यात येऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.तसेच गावातील काही समर्थक व हितचिंतक कार्यकर्त्यां यांच्याकडे सुद्धा घरगुती अभिष्टचिंतन कार्यक्रम आयोजित करून सरपंच दिपक पाटील यांना वाढदिवसाच्या स्वागत-सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.एखाद्या सरपंचाच्या वाढदिवसानिमित्त गावात तब्बल ७० ठिकाणी केक कापला जाण्याची पहिलीच वेळ ठरली आहे.अभिष्टचिंतन शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सरपंच दिपक पाटील दिवसभर ग्रामपंचायत कार्यालयात हजर होते.यावेळी गाव परिसरातील असंख्य हितचिंतक कार्यकर्ते,परिसरातील गावाचे सरपंच,पदाधिकारी तसेच गावातील अनेक स्थानिक आजी-माजी पदाधिकारी यांनी सरपंच दीपक पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सकाळी दिपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गाव स्वच्छ व सुंदर राहण्याकरता साकळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील व्यावसायिक दुकानदारांना सकाळी प्रातिनिधिक स्वरूपात डस्टबीन वाटप करण्यात.यावेळी उपसरपंच
नूरबी तस्लीम खान यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, हितचिंतक कार्यकर्ते उपस्थित होते.यानंतर हिंदूस्मशानभुमीमध्ये दशक्रिया विधीच्या शेड कामांचा शुभारंभ सरपंच दिपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.त्याचप्रमाणे सरपंच दिपक पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे मित्र उदयभाऊ महाजन,मनोजभाऊ शिरसाळे व मित्र परिवार तर्फे वेले ता चोपडा येथील मुकबधिर शाळेत २०० जणांना जेवण देऊन वाढदिवसानिमित्त मानवतेची सेवा करून वाढदिवस साजरा केला.सरपंच दिपक पाटील यांना वाढदिवसानिमित्त तालुका,जिल्हा भरातून तसेच राज्यस्तरावरून अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून तर काहींनी प्रत्यक्ष येऊन शुभेच्छा दिल्या.यात आमदार रोहीतदादा पवार,माजी मंत्रीआमदार अनिल पाटील,प्रल्हादभाऊ प्रतिष्ठान(अंबरनाथ),
कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या राक्षे,विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी आमदार मनिषदादा जैन, कैलासबापु पाटील,राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुबभाई शेख,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते योगेशभाऊ देसले, प्रदेश उपाध्यक्ष ललितभाऊ बागुल, माजी जि.प.सदस्या सौ. सविता भालेराव व त्यांचे पती अतुल भालेराव, काँग्रेस गटनेते प्रभाकरआप्पा सोनवणे, माजी शिक्षणव व आरोग्य सभापती रविंद्र पाटील,माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुरेश आबा पाटील, माजी समाजकल्याण सभापती प्रभाकरआप्पा गोटु सोनवणे,खरेदी विक्री संघाचे चेअरमन नरेंद्रजी नारखेडे, भाजपा सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिलनाना साठे, राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुलभाऊ पाटील, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळुदादा धुमाळ , कृउबा संचालक नारायणबापु चौधरी, पंकजशेट चौधरी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुकेश येवले सर , चोपडा कारखान्याचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी,रावेर बाजार समितीचे सभापती सचिनभाऊ पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार,माजी नगराध्यक्ष जीवनभाऊ चौधरी यांचे सह अनेकांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या तर माजी पंचायत समिती सभापती दिपक आण्णा पाटील,माजी पं.स.सदस्य अरूण आबा पाटील,साकळी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष युनूसशेठ पिंजारी,कार्याध्यक्ष सुभाष नाना महाजन तसेच समितीचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवकांत पाटील,कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल,वड्रीचे सरपंच अजय भालेराव,शिरसाडचे सरपंच दिपक इंगळे, उपसरपंच राजेंद्र सोनवणे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,वडोद्याचे नरेंद्र सोनवणे,चिंचाळ्याचे नानाभाऊ धनगर,शिरसाड येथील लिलाधर धनगर,देवाभाऊ धनगर व मित्र परिवार यांचे सह अनेकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सरपंच दिपक पाटील यांना शुभेच्छा दिल्या.