विद्यार्थ्यांसाठी संवेदनात्मक उपक्रम; एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि PMUSHA-SOFT COMPONENT यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी संवेदनात्मक संयुक्त विद्यमाने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेसाठी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला, वाणिज्य ,व विज्ञान यावल महाविद्यालय प्र. प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे , उपप्राचार्य प्रा. एम.डी खैरनार, उपप्राचार्य डॉ. एस. पी. कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेसाठी यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी कार्यक्रमाला भालोद महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.के.जी. कोल्हे, उपप्राचार्य डॉ. मुकेश चौधरी, डॉ.सुनील नेवे, प्रा.आर. बी. इंगळे (भालोद महाविद्यालय ) कार्यशाळेचे मूळ उद्दिष्टे विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता वाढावी. दैनंदिन जीवनात उपयोगी असा उपक्रम होता.एका दिवसातून चार सत्र आयोजित करण्यात आले पहिले सत्र पर्यावरण साक्षरतेविषयी, दुसरे सत्र डिजिटल साक्षरते विषयी, तिसरे सामाजिक साक्षरते विषयी तर चौथे सत्र आर्थिक साक्षरता या विषयाचे होते. प्रा. हेमंत पाटील तसेच
कार्यशाळेसाठी यावल महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.