उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे प्र.प्राचार्या. डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मतदार जनजागृती निमित्त कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते प्राध्यापक मनीष बारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मतदान करणे म्हणजे लोकशाही बळकट करणे त्यामुळे मतदान करणे प्रत्येक व्यक्तीचा नैतिक कर्तव्य आहे. ह्यावेळी बारी यांनी खेडोपाड्यांचा शहरांचा विकास हा लोकप्रतिनिधीवर अवलंबून असतो त्यामुळे जर हिताची कामे करण्यासाठी मतदान हा अधिकार राज्यघटनेने १८ वर्षे वयोगटावरील सर्वच नागरिकांना दिलेला आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भारत हा लोकशाही प्रधान देश म्हणून जगात ओळखला जातो भारताची लोकशाही हे मोठी जन शक्ती आहे त्यामुळे मतदान करून प्रतिनिधी निवडून देणे हा जनतेचा अधिकार समजला जातो. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधान परिषद, विधानसभा व लोकसभे पर्यंत प्रतिनिधी मतदान करूनच निवडून दिले जातात यावेळी डॉ कापडे यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे उदाहरण दिले खेडोपाड्यात मतदान जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. असे सांगितले कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात मतदान जागृती आधारित निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निबंध स्पर्धेत कु. अर्पिता न्हावी (F.Y.B.A) प्रथम क्रमांक कु. दिव्या पाटील (F.Y.B.A) तर घोषवाक्य स्पर्धेत कु.तणिशा साळवे (F.Y.B.A) तर कु. दीक्षा पंडित ( S.Y.B.A) द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली कार्यक्रमाच्या चौथ्या सत्रात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी मतदान जनजागृती संदर्भात शपथ घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सुभाष कामडी यांनी केले तर आभार प्रा. सि टी वसावे यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला डॉ. हेमंत भंगाळे, डॉ निर्मला पवार, प्रा. प्रतिभा रावते, प्रा. हेमंत पाटील, प्रा. प्रशांत मोरे, प्रा. रामेश्वर निंबाळकर कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री मिलिंद बोरघडे संतोष ठाकूर दुर्गादास चौधरी प्रमोद भोईटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.