धरणगाव:- दि. २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय झुरखेडा येथे ७६ वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेशआप्पा पाटील लोकनियुक्त सरपंच यांनी भूषविले, अध्यक्ष यांनी आज एक आगळा वेगळा उपक्रम राबवत ग्रामपंचायतचे ध्वजारोहण श्रीमती मनिषाबाई भिका चौधरी यांचेकडून करण्याचे ठरविले त्याचे कारण असे की, त्या बघिणी दोन्ही पायाने अपंग (दिव्यांग) असल्यामुळे हा मान त्यांना देण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, बबन पाटील,संजय चौधरी, विमलबाई विसावे, मिनाबाई ननवरे, कांचन चौधरी,माधुरी चौधरी, कल्पना पाटील, नामदेव बाविस्कर पाणी पुरवठा कर्मचारी, धोंडू शिरसाठ सफाई कर्मचारी, पोलिस पाटील प्रल्हाद चौधरी, सोपान चौधरी, मंगल पाटील, गोपाल चौधरी, जितेंद्र चौधरी, महेंद्र चौधरी, दिपक चौधरी, संदीप चौधरी इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रसंगी राष्ट्रगीत, राज्यगीत,ध्वजगीत , संविधान वाचन घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, देश भक्तीपर गीते सादर केली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय पी पाटील सर यांनी केले प्रास्ताविक जि प शाळेचे शिक्षक महेश पाटील सर यांनी केले, आभार गजानन माळी सर यांनी मानले प्रसंगी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव ग्रामपंचायत झुरखेडा येथे दिव्यांग महिला बघिणीकडून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न !