यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली नर्सरी तंत्रज्ञानाची माहिती !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील कृषी विज्ञान समिती व कृषी विज्ञान केंद्र पाल (MOU) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी नर्सरी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यावल शहरातील प्रगतशील शेतकरी व सेवानिवृत्त शिक्षक पि.टी.चोपडे सर यांनी विद्यार्थ्यांना शेतीतील प्रगत तंत्रज्ञान, टिशू कल्चर,नर्सरी तसेच विविध प्रकारचे पीक रोपे कशाप्रकारे तयार केली जातात. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले . प्रा. अर्जुन गाढे यांनी आभार मानले . नर्सरी भेट यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.पी.कापडे,प्रा.एम.डी.खैरनार,डॉ.,प्रा. अक्षय सपकाळे,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.मनिष बारी,प्रा.हेमंत पाटील,प्रा.डॉ. निर्मला पवार यांनी परिश्रम घेतले. बहुसंख्य विद्यार्थी नर्सरी भेटीसाठी उपस्थित होते.