श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल: येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहण संस्थेचे सचिव जगनाथ कोळी यांनी केले . प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीपर गीतांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्य सादर केले यामध्ये एकूण सोळा गीतांचा समावेश होता, यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलांचा व सुप्त गुणांचा अविष्कार केला. ध्वजवंदनेसाठी व आपल्या मुलांची कला पाहण्यासाठी गावातील पुरुष पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी दिली होती. शेवटी पालकांना सांगावे लागले की आजचा कार्यक्रम आज संपलेला आहे तेव्हा पालक जागचे हलले.
गीतांमध्ये विशेष म्हणजे गायरानातील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले आदिवासी नृत्य गीत याला विशेष प्रतिसाद मिळाला व पालकांकडून वन्स मोर ची ऑफर आल्याने गीत पुन्हा सादर करावे लागले. त्याचप्रमाणे इयत्ता पाचवीच्या चिमुकल्यांचे गीत व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे नृत्य गीत पालकांचे लक्ष वेधून गेले. प्रत्येक गीताला पालकांकडून श्रोत्यांकडून व विद्यार्थ्यांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य व्हि.जी. तेली, सूत्रसंचालन एस.बी.गोसावी, आभार प्रदर्शन डी.बी.मोरे यांनी केले, म्युझिक सिस्टीम वाय वाय पाटील यांनी सांभाळली. गीत सादर करण्याचा क्रमानुसार एन.जे.पाटील यांनी पाठवले विद्यार्थिनींच्या व विद्यार्थ्यांच्या वेशभूषेवर एस.एन.चौधरी, शारदा चौधरी, जे.बी. तडवी यांनी विशेष लक्ष ठेवले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक एस.एस.पाटील, एम.पी.पाटील,एम.आर.चौधरी,पी एस.सोनवणे, आर.जे.अडकमोल, यांनी केले. तर नागरिकांची व पालकांची व्यवस्था शिक्षकेतर कर्मचारी अनिल कोळी,आर.के.पाटील.ऐ.एस. कोळी, के.बी.धनगर,ए.बी.बोरसे यांनी व्यवस्थित पार पाडत कार्यक्रम यशस्वी केला.