यावल:- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागामार्फत ओझोन दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत अनुक्रमे स्वाती संजय बाविस्कर (तृतीय वर्ष विज्ञान)-प्रथम, नंदिनी दिलीप गुजर(तृतीय वर्ष विज्ञान)- द्वितीय, तर टिनू गणेश पाटील(तृतीय वर्ष कला )-तृतीय क्रमांक पटकवून यशाचे मानकरी ठरले. या स्पर्धेचे आयोजन प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. अर्जुन गाढेयांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील, प्रा एम.डी.खैरनार, डॉ. आर. डी. पवार, प्रा. सुभाष कामडी, प्रा.प्रशांत मोरे, शाहरुख तडवी, तेजश्री कोलते, सागर धनगर आदींनी परिश्रम घेतले.