उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या निर्देशानुसार यावल महाविद्यालयाने ११ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन NEP 2020 स्कूल कनेक्ट २.० अंतर्गत अभियान राबविण्यात आले.त्यासाठी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ.सुधीर कापडे व प्रा.इमरान खान यांची उपक्रम समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. प्र प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांच्या सूचनेनुसार सरस्वती विद्या मंदिर यावल, गुरुमाई कन्या शाळा यावल, साने गुरुजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यावल, इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल यावल, शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळा यावल, डॉ. झाकीर हुसैन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यावल, जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल यावल, बाल संस्कार माध्यमिक विद्यालय ,यावल, सरदार पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल, अंजुमन ए इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज साकळी ता. यावल, कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यावल व तालुक्यातील 11 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील एकूण 1111 विद्यार्थी होते त्यात 386 मुले व 725 मुली या विद्यार्थ्यांना स्कूल कनेक्ट २.० अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला पालक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी डॉ. सुधीर कापडे आणि प्रा. इमरान खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परिश्रम घेतले.