साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उखान्यांनी रंगला हळदी – कुकंवाच्या सोहळा !

0

प्रतिनिधी, गोकूळ कोळी मो:9767482368

मनवेल ता यावल : प्रत्येक स्त्री सण उत्सव सह कामाच्या व्यापात व्यस्त असल्याने एक दिवस आराम मिळावा व तिच्या करीता विशेष असवा म्हणून आशा स्वंयम सेविका व गटप्रर्वतक याच्या मार्फत साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात हळंदी – कुकुवाच्या कार्यक्रम उखान्यासह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती कवडीवाले याच्या हस्ते सावीत्रीबाई फुले याच्या प्रतिमेची पुजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती कवडीवाले याच्या पासून उखाण्यांना सुरवात करून उखाणे, संगीत खुर्ची , निंबु चमचा सह विविध कार्यक्रम साजरे करून प्रत्येक उपस्थित महिलांना पर्स , लक्ष्मी पादुका, हळदी कुंकू पात्र, तिळ गुळ वाटप करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका मनिषा कोळी, मोनिका फर्नाडिस, वृषाली पाटील, रमा पवार उपस्थित होत्या. प्रास्तविक व सुत्रसंचालन सुनैना राजपूत यांनी केले तर गटप्रर्वतक चित्रा जावळे, लीना पाटील सह आशा स्वंयम सेविका यांनी परिश्रम घेतले.