यावल महाविद्यालयात विविध स्पर्धा संपन्न !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक – २८ जानेवारी २०२५ मंगळवार रोजी मेहेंदी स्पर्धेत कु.तनिशा साळवे ( F.Y.B.com)प्रथम तर कु.दीपिका बारी(FY b.com) व हर्षल कोळी (S.Y.B.A) हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तर संगीत खुर्ची या स्पर्धा प्रकारात कु वैभवी पाटील (T.Y.B.Com) हिने प्रथम तर तैजित तडवी ( SY.B.A) द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.पी.कापडे, उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार हे उपस्थित होते. सदर स्पर्धेचे आयोजन प्रा.डॉ.वैशाली कोष्टी, प्रा. डॉ. निर्मला पवार यांनी केले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. प्रतिभा रावते,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.अर्जुन गाढे,प्रा.सी.टी.वसावे,प्रा.अक्षय सपकाळे,प्रा.हेमंत पाटील, प्रा. प्रशांत मोरे यांनी सहकार्य केले.