उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल):- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह. समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. पी. कापडेे, प्रा. संजय पाटील, डॉ. एच. जी. भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा आदी उपस्थित होते. उद्घाटन पर मार्गदर्शन करताना प्रा. एम. डी. खैरनार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर मैदानी स्पर्धेत भाग घेणे गरजेचे आहे. मैदानी खेळ खेळल्याने स्वतःचे स्वास्थ्य व शरीर निरोगी राहते. फक्त शिक्षण घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही, तर खेळामध्ये सहभाग घेऊन आपण यश मिळू शकतो. भारतीय खेळाडूं मध्ये खेळाची आवड व रुची होती म्हणून खेळाडूंनी देशाचे नेतृत्व केले. अशा खेळाडूंपासून आपण प्रेरणा घ्यावे असे सांगितले. डॉ. कापडे यांनी आपल्या मार्गदर्शनात आवडीच्या खेळामध्ये सातत्य व सराव मुळे यश मिळू शकते, खेळाच्या प्रमाणपत्रामुळे नोकरीत प्राधान्य मिळते असे सांगितले. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या यात..
१०० मी धावणे मुले
जुनेद तडवी- प्रथम, (द्वितीय वर्ष कला)
जाकिर खान – द्वितीय (द्वितीय वर्ष कला)
समीर तडवी – तृतीय (तृतीय वर्ष कला)
१०० मी धावणे -मुली
अस्मा तडवी प्रथम (द्वितीय वर्ष कला)
कोमल कुरकुरे द्वितीय (प्रथम वर्ष विज्ञान)
नंदिनी महाजन तृतीय (तृतीय वर्ष विज्ञान)
लांब उडी मुले
तनवीर तडवी प्रथम (द्वितीय वर्ष कला)
तुषार बारेला द्वितीय (प्रथम वर्ष विज्ञान)
जाकीर खान तृतीय (द्वितीय वर्ष वाणिज्य)
लांब उडी मुली
अस्मा तडवी प्रथम (द्वितीय वर्ष कला)
कविता बारेला द्वितीय (प्रथम वर्ष कला)
गोळा फेक मुले
अनंत बा-हे प्रथम (प्रथम वर्ष कला)
मयुर लोधी द्वितीय (द्वितीय वर्ष कला)
प्रदीप कोळी प्रथम (प्रथम वर्ष कला)
गोळा फेक मुली
लक्ष्मी भील्ल प्रथम (द्वितीय वर्ष कला)
अस्मा तडवी द्वितीय (द्वितीय वर्ष कला)
हेमांगी बुंदले तृतीय (तृतीय वर्ष कला)
भाला फेक मुले
कु.प्रदीप कोळी प्रथम (प्रथम वर्ष कला) जाकिर खान द्वितीय (द्वितीय वर्ष कला)
मयुर लोधी तृतीय (तृतीय वर्ष वाणिज्य)
भाला फेक मुली
लक्ष्मी भील्ल प्रथम (द्वितीय वर्ष कला)
कविता बारेला द्वितीय (प्रथम वर्ष कला)
नेहा सोनवणे द्वितीय (द्वितीय वर्ष कला)
थाळी फेक मुले
अमोल सोनार प्रथम (द्वितीय वर्ष कला)
जाकिर खान (द्वितीय वर्ष वाणिज्य)
मयुर लोधी तृतीय (तृतीय वर्ष वाणिज्य)
थाळी फेक मुली
लक्ष्मी भील्ल प्रथम (द्वितीय वर्ष कला)
श्रद्धा पंडित द्वितीय (प्रथम वर्ष कला)
कविता बारेला तृतीय (प्रथम वर्ष कला)
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. एस. डी. जाधव, प्रा. सि. टी. वसावे, प्रा. प्रतिभा रावते, प्रा. अर्जुन गाढे, डॉ निर्मला पवार, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा. अक्षय सपकाळे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रभारी क्रीडा विभाग प्रमुख डॉ. आर. डी. पवार यांनी केले तर आभार प्रा. नरेंद्र पाटील यांनी मानले. क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.