यावल महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती सभेअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणाऱ्या आत्मनिर्भर युवती सभे अंतर्गत सौ. कल्याणी बडगुजर(ब्युटीशियन), यांचे नेतृत्व कौशल्य विकास, दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ. वैशाली निकुंभ ( मेडिकल ऑफिसर) यांचे महिलांचे आजार आणि समस्या, ५ फेब्रुवारी रोजी मा. भारत वारे (अग्रीकल्चर ऑफिसर ) यांचे कृषि विषयक जनजागृती  ६ फेब्रुवारी  रोजी मा. प्रदीप ठाकूर (पोलीस निरीक्षक यावल) यांचे सायबर क्राईम, ७ फेब्रुवारी रोजी रितेश सावरकर (सेंट्रल बँक यावल) यांचे डिजिटल बँकिंग व्यवहार ८ फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकासप्रमुख उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे,प्रा. प्रतिभा रावते यांनी केले आहे.