उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
धानोरा येथे संत रोहिदास जयंती साजरी; पुढील वर्षापासून गरीब मुले घेणार दत्तक !
चोपडा/धानोरा:- ग्रामीण भागातील तरुणांनी शैक्षणिक प्रगती साधत असताना उद्योगी शिक्षण घेऊन कुटुंबाला व समाजाला पुढे न्यावे, सध्या सर्व स्तरातून उन्नती साधत असताना खूप स्पर्धा पहावयास मिळत आहे , चर्मकार समाजाच्या वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करून एखादा मोठा उद्योग सुरू करता येऊ शकतो,शिक्षणासाठी आपण एखादा मोठ्या उद्योगपती यांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग योजनांची माहिती घेतली पाहिजे यातून प्रगती साधन्याची शक्यता जास्त असते अशी माहिती अडावद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजू थोरात यांनी आयोजित कार्यक्रमात केले. चोपडा तालुक्यातील धानोरा येथील चर्मकार वाड्यात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन चा व प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान पदाधिकारी यांचा सत्कार ही करण्यात आला.यावेळी अडावद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजू थोरात,सरपंच रज्जाक तडवी,पोलीस जयदीप राजपूत,माजी सैनिक देविदास सोनवणे,होमगार्ड चंद्रकांत सोनवणे,दिलीप सोनवणे, लोटन सोनवणे, शांताराम सोनवणे, विलास सोनवणे, अनिल निभोरे,वैभव निंबाळकर,अविनाश वानखेडे,चेतन सोनवणे,रोहन सोनवणे,प्रविण सोनवणे यांच्या सहित महिला समाजबांधव आदी उपस्थित होते.सूत्रसंचन प्रशांत सोनवणे यांनी केले तर आभार अजय निंबाळकर यांनी केले.यावेळी सरपंच रज्जाक तडवी यांनी ही समाजाचा उंचावत असलेला आलेख हा वाखण्याजोगा आहे असे सांगितले.
दरवर्षी साध्या पद्धतीने जयंती साजरी..
येथील चर्मकार समाज बांधव हे कुठलीही मिरवणूक न काढता वाजा गाजा न लावता संत रोहिदास यांची जयंती दरवर्षी साध्या पद्धतीने जयंती साजरी करतात.तरी पुढील वर्षी समाजाच्या वतीने गरीब मुलाना शैक्षणिक साहित्य वाटून जयंती साजरी केली जाणार असल्याची माहिती समाजाच्या वतीने देण्यात आली.
ओट्याचे काम दुर्लक्षित मुळे समाज बांधव नाराज
गावात चर्मकार वाड्यात ३० घरे आहेत.येथे एक मुंजोबा चा ओटा अनेक वर्षापासून आहेत दरवर्षी ग्रामपंचायत मधील सरपंच व पदाधिकारी हे आश्वासन देतात की ओटा नूतनीकरण करून देऊ . पण अजूनही कुठलेही काम न झाल्याने समाज बांधव यांनी आयोजित कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली.