श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालय चुंचाळे येथे माजी विद्यार्थ्यांचा २००३-०४ बॅचचा स्नेहसंमेलन उत्साहात

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

शाळेस दिले ४० ते ८० लिटर चे वाटर फिल्टर भेट !

यावल:- तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालय येथे माजी विद्यार्थ्यांचा सन २००३-०४ बॅचचा स्नेहसंम्मेलन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला,त्यात प्रमुख अतिथी म्हणुन शाळेचे सचिव जगन्नाथ कोळी सर व शाळेतील प्राचार्य व्ही.जे.तेली सर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे व श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली,शाळेतील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी संदीप तेली व ज्योती राजपूत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कार्यक्रमास एकूण ३५ विद्यार्थी विद्यार्थिनी किरण सावकारे, गणेश पाटील सिकंदर तडवी , रफिक तडवी,विनोद पाटील, विनोद मराठे, दिवाकर पाटील,उल्हास लोहार, इरफान तडवी,आरिफ तडवी,रामराव पाटील,दिलीप सोनवणे,समाधान गोसावी,शशिकांत सपकाळे,सायरा तडवी,मीना तडवी,रेश्मा तडवी,वैशाली कोळी,मीना तडवी,फातीमा तडवी,नजीमा तडवी मिळून सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गांचा सत्कार केला त्यानंतर शाळेमार्फत माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले,गुरुजनांनी मुला मुली बद्दलचे मनोगत व्यक्त केले,सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनींनी शाळेत वोल्टास कंपनीचे ४०ते ८० लिटरचे वॉटर कुलर भेट दिले व त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला पण निरोप समारंभ झाला नेहमीप्रमाणे जुन्या आठवणी ताज्या करून सर्वांनी वर्गात बेंचवर बसून हजेरी लावून सरांना छोटसं पाठाचं मार्गदर्शन करण्यास सांगून त्यांनी सर्वांना निरोप दिला,कार्यक्रमास सर्वांनी प्रतिसाद दिला व कार्यक्रम मोठ्या उत्सहाने साजरा झाला, सर्वांचा आनंद एकमेकांना भेटून द्विगुणित झाला त्यासाठी सर्वांनी शाळेचे आभार मानले.