मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. सुनिल पाटील यांच्या प्रिस्क्रिप्शनचे केले विमोचन !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- डॉक्टर रुग्णतपासणी झाल्यानंतर रुग्णांना जे Prescription (औषधाची चिठी ) देतात त्याची मागील बाजू कोरीच असते. हे लक्षात घेऊन भाजपा वैद्यकीय आघाडी जळगाव पुर्वचे सहसंयोजक डॉ. सुनिल पाटील, साकळीकर यांनी 2025-26 च्या मोदी सरकार -3 चा केंद्रीय अर्थसंकल्प मधील वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रासाठी असलेल्या ₹95,950/-कोटी रुपयांच्या सविस्तर तरतूदिंचा उल्लेख प्रिस्क्रिप्शन च्या मागील कोऱ्या बाजूस छापून मोदीसरकार आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राबाबत संवेदनशील असून हेल्थ बजेट चा प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रिस्क्रिप्शनचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मा. गिरीश महाजन आयोजित नमो कुस्ती महाकुंभ – 2, देवाभाऊ केसरी स्पर्धेसाठी आले असतांना जळगाव येथे त्यांच्याहस्ते विमोचन झाले .सदरप्रसंगी जळगाव शहराचे सन्माननीय आमदार राजुमामा भोळे उपस्थित होते. सदर प्रिस्क्रिप्शनच्या मागील बाजूस 2025-26 च्या मोदी सरकार -3 चा केंद्रीय अर्थसंकल्प मधील वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रासाठी असलेल्या ₹95,950/-कोटी रुपयांच्या सविस्तर तरतूद उल्लेख, जीवनावश्यक 36औषधंवरील Custom टॅक्स मधील सुट, 200 Day Care Cancer निर्मिती, पंतप्रधान आयुष्यमान भारत साठी दहा हजार कोटी तरतूद, राष्ट्रीय आरोग्य अभियानसाठी 37,000 कोटी तरतूद, वैद्यकीय पर्यटन मुळे भारत वैद्यकीय दृष्टीने जागतिक पटलावर कसा जाईल, आगामी वर्षात दहा हजार वैद्यकीय जागा वाढविण्याचा निर्णय अश्या महत्वपुर्ण तरतुदी Prescription च्या मागील कोऱ्या बाजूला छापून त्याद्वारे विकसित भारत @2047 हा सशक्त व सुदृढ भारत निर्माण होण्यासाठी मोदीसरकारचे प्रयत्नया सर्व बाबींचा उल्लेख डॉ. सुनिल पाटील यांनी केलेला आहे. या उपक्रमाचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कौतुक केले. संकल्पना खुपच चांगली असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले. मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस  यांची भेट व विमोचन जलसंपदामंत्री मा.  गिरीश महाजन, आमदार राजुमामा भोळे, आमदार अमोल जावळे यांच्यामुळे झाली, असे डॉ. सुनिल पाटील यांनी सांगितले.