उपसंपादक, दिपक नेेवे मो:9665125133
सुमितच्या उपचारासाठी संपूर्ण नाव एकवटले, बडगुजर परिवारावर दुःखाचा डोंगर
साकळी:- येथील रहिवासी असलेला १८ वर्षीय चि.सुमित बडगुजरचा अल्पशा आजारावर जळगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना त्याचा गेल्या तब्बल ६० तासांपासून जीवन-मरणाशी संघर्ष सुरू होता.त्याची तब्येत खालावल्याने हा संघर्ष संपून दि.१८ रोजी मध्यरात्री त्याचा करूण अंत होऊन अखेर त्याचा जीवन प्रवास थांबला.या दुर्दैवी घटनेने संपूर्ण साकळीसह पंचक्रोशी हळहळली आहे.मयत सुमित हा घरातील कमवता- कर्ता व्यक्ति होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की,साकळी ता.यावल येथील रहिवाशी असलेले कै.रघुनाथ माधव बडगुजर (आबाभाऊ) यांचा मोठा मुलगा चि.सुमित याची दि.१६ वार रविवार रोजी तब्येत अचानक खराब होऊन जीवघेणा असा पोटदुखीचा त्रास जाणवू लागला.त्याला असह्य वेदना होत होत्या.त्यादरम्यान त्याची आई व त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथे नेले व एका खाजगी दवाखान्यात भरती केले.डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला पोटाचा गंभीर आजार उद्भवलेला असल्याचे सांगितले.तेथे वेळ वाया न घालता पोटाच्या विकारावर अर्जंट ऑपरेशन करण्यात आले.डॉक्टरांच्या सांगण्यानुसार,ऑपरेशन नंतरही सुमित तब्येतीत फार काही सुधारणा होत नसल्याने कुटुंबीयांसह सर्वांची चिंता वाढली होती. तरी त्याच्यावर शक्य होईल तेवढे उपचार सुरू होते.
मात्र त्याची तब्येत अधिकच खालवल्याने उपचारादरम्यान दि.१८ रोजी मध्यरात्री साधारणतः ११ वाजेला त्याची प्राणज्योत मलावली व त्याचा दुर्दैवी अंत झाला.मयत सुमितचा मृतदेह रात्रीच घरी आणण्यात आलेला होता.दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता त्याच्यावर साकळी येथील स्मशानभूमीत अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत सुमितच्या पश्चात आई, एक भाऊ असा परिवार आहे. सुमितच्या वडिलांचे व आजोबांचे जवळपाच पाच वर्षापुर्वी निधन झाल्याने त्याचे पितृछत्र हरपलेले होते.या कुटुंबाची घरची परिस्थिती अतिशय गरीबीची व हालाखीची होती. सुमितच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती.तो आपले शिक्षण पूर्ण करून जेमतेम कमाई करून घर चालवीत होता.तो अतिशय मनमिळावू व मित्र परिवारचा लाडका होता.त्याच्या उपचारासाठी साकळी गाव पंचक्रोशीसह सर्व नातेवाईकांनी-मित्रपरिवाराने मदत केली.
…खरंच गावाचा सार्थ अभिमान !
सुमितच्या ऑपरेशन व उपचारासाठी जवळपास लाख-दिडलाखापर्यंत खर्च येणार होता.व एवढा खर्च करणे सुमितच्या आईला शक्य नव्हते.ही बाब साकळीकरांच्या लक्षात आल्यावर मदतीसाठी संपूर्ण गाव सरसावले.ज्यांना शक्य तेवढी मदत करून गावातील गावकऱ्यांनी मदतीचा हात देऊन मोठी आर्थिक मदत केली असून ती त्याच्या उपचारासाठी कामी आली.या दुःखदायकप्रसंगी गाव एकत्र आल्याने सर्वांनाच गावाचा सार्थ अभिमान वाटला.
लहान भावाच्या मित्रांची मदतीसाठी घालमेल !
आपला मोठा भाऊ सुमितच्या उपचारासाठी खूप मोठा खर्च येणार आहे हे सुमितचा लहान भाऊ कल्पेश (वय-१३) याला समजल्यावर त्यांने ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगितली असता सर्व बालमित्रांनी पैसे कसे जमवायचे यासाठी घराजवळ असलेल्या एका चिंचेच्या झाडाखालील चिंचा गोळा करून त्या चिंचा विकून सुमितच्या उपचारासाठी पैसे गोळा केले.ही बाब जेव्हा एका गावकऱ्यांने सर्वांसमोर सांगितले असता उपस्थिती डोळे पाणावले होते.